सचिनचे ट्विटरवर ३ कोटी फॉलोअर्स


वेब टीम : दिल्ली
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव असलेल्या सचिनच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सचिनच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता तब्बल ३ कोटींच्या पुढे गेली आहे.ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की,” बऱ्याच वर्षापासून आपले सहकार्य, तसेच प्रेम मिळत आहे. खूप आनंद झालाय. आपले कुटुंब आता ३ कोटी इतके मजबूत झाले आहे. धन्यवाद’. असे म्हणत सचिनने एक व्हिडिओ सुद्धा चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन एक शॉट खेळताना दिसत असून चेंडू सरळ सीमारेषापार जाताना दिसत आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक असल्याने तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या आता ३ कोटी ९ लाख इतकी आहे. तर सचिनच्या फॉलोअर्सची संख्या ३ कोटी १ लाख इतकी आहे. ट्विटरवर ३ कोटी फॉलोअर्सची संख्या पार केल्यानंतर सचिनने आनंद व्यक्त केला.

विराट कोहली सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतो. तो सतत ट्विट करतो. विराटने नुकताच त्याच्या चाहत्यांसाठी व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओला चार लाखांपेक्षा जास्त पाहिला गेला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post