वेब टीम : अहमदनगर मनपा शहर अभियंत्यांवर शिवसैनिकाने बूट फेकल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेना उपनेते व माजी मंत्री अनिल राठोड गुरुवारी ...
वेब टीम : अहमदनगर
मनपा शहर अभियंत्यांवर शिवसैनिकाने बूट फेकल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेना उपनेते व माजी मंत्री अनिल राठोड गुरुवारी (दि.१) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या अटकेची कार्यवाही होऊन त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
राठोड यांच्याकडून करण्यात आलेला जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणी दरम्यान त्यांची शुगर व बीपी वाढल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बोल्हेगाव रस्त्याचे रखडलेले काम सुरु करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता.
या प्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेना नगरसेवक, कार्यकर्त्यांसह अनिल राठोड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकार्यांना धमकावणे, शिविगाळ करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
COMMENTS