वेब टीम : दिल्ली माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाच...
वेब टीम : दिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाचे होते.
जेटली यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आले होते. या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन AIIMSमध्ये दाखल झाले होते.
तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले होते.
त्यानंतर आता जेटली यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.
गेल्या काही वर्षांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढ उतार होत आहे. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लंटची शस्त्रक्रिया झाली होती.
तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
सप्टेंबर 2014मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते.
तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMSमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तर त्याआधी त्यांच्या हृदयचे ऑपरेशन झाले होते.
COMMENTS