माजी अर्थमंत्री अरुण जेटली रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर


वेब टीम : दिल्ली
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आज, दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांना नियमित तपासणीसाठी आणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन दिक्षीत हे रूग्णालयात दाखल झाले आहेत.

जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना  अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.  मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ नये.

जेटलींनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, आपल्या नेतृत्वात पाच वर्षे काम करण्याचा अनुभव छान होता. या अगोदर देखील एनडीए सरकारने मला जबाबदारी दिली होती. सराकर शिवाय संघटनेत आणि विरोधी पक्ष नेत्याच्या रूपातही मला महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता मला काही नकोय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post