अरुंधती रॉय यांना अखेर उपरती; लष्कराबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर माफीनामा


वेब टीम : कोलकाता
लेखिका अरुंधती रॉय यांनी भारतीय लष्कराशी संबंधित केलेल्या एका जुन्या वक्तव्या प्रकरणी आता माफी मागितली.

आपण आपल्या आयुष्यात एखाद्या क्षणी चुकीने काहीतरी बोलतो, जे मुर्खपणाचे असते. ही चिंतेची बाब आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असल्यास मी माफी मागते’, अशा शब्दात रॉय यांनी माफी मागितली.

 रॉय यांनी सुमारे नऊ वर्षांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी रॉय यांच्यावर टीका सुरू केली होती.

अरुंधती रॉय यांनी २०११ मध्ये वादग्रस्त वक्तव्य करताना म्हणतात,”काश्मीर, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडसारख्या राज्यांमध्ये आम्ही युद्ध करत आहोत.

आम्ही १९४७ पासूनच आम्ही काश्मीर, तेलंगण, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालँडमध्ये लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने आपलेच सैनिक आपल्याच लोकांसमोर उभे केले.

पाकिस्तानने देखील अशा प्रकारे आपले लष्कर कधी आपल्याच लोकांविरोधात तैनात केले नाही”.

पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी, काश्मीरमध्ये मुस्लीम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध भारतीय राज्ये लढत आहेत. असे वाटते जणू हा उच्चवर्णीय हिंदूंचाच देश आहे, असे अरुंधती रॉय यांनी पुढे म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post