तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का


वेब टीम : हेडिंगले
ऍशेस मालिकेच्या तिसऱ्या कसोटी आधी ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही.

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जोफ्रा आर्चरचा बाउन्सर मानेवर आदळल्याने स्मिथ जखमी झाला होता.

चौथ्या दिवशी ८० धावांवर खेळात असताना स्मिथच्या मानेवर जोफ्रा आर्चरचा बाउन्सर आदळला. जखमी झाल्यानंतर स्मिथने मैदान सोडले होते पण काही वेळानंतर तो परत आला.

त्यानंतर ९२ धावांवर तो पायचीत झाला. कसोटीच्या अखेरच्या दिवशी डोकेदुखी आणि दुखापतीमुळे तो मैदानात उतरला नाही. तिसऱ्या कसोटीसाठी स्मिथ तंदुरुस्त व्हावा यासाठी त्याची विशेष काळजी घेण्यात येत होती, परंतु त्याला माघार घावी लागली.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्मिथ खेळणार नसल्याची घोषणा केली. तिसऱ्या कसोटीसाठी स्मिथ ऐवजी बदली खेळाडू म्हणून खेळलेल्या लाबुशेनला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post