भाजपा म्हणजे ‘बाहेरून जमवणाऱ्यांची पार्टी’ – अजित पवार


वेब टीम : शेवगाव
शिवस्वराज्य यात्रेया दुसऱ्या दिवशी शेवगाव येथे झालेल्या सभेत विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला.

सरकार कसं चालवायचं हे सत्ताधाऱ्यांना सांगावं लागत आहेत. दुष्काळ पडला तेव्हा छावण्या सुरू करा, टँकर द्या हे सरकारला सांगावे लागले. शिवाय पाऊस पडल्यावर काही काळ छावण्या लगेच बंद करू नका, असेही सरकारला सांगावे लागले. त्यामुळे या सरकारला राज्याचा कारभार कसा चालवायचा, हेच कळत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.


राज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून सरकारने काम करणे अपेक्षित असते. मात्र इथे जनतेचे काम करण्याऐवजी मुख्यमंत्री कोण होणार, यावर चढाओढ सुरू आहे. गुडघ्यावर बाशिंग बांधूनच भाजपा-शिवसेना बसले आहेत, अशी टीका पवार यांनी केली.


महाराष्ट्रात भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत असल्याने भाजपचे नाव ‘बाहेरून जमवणाऱ्यांची पार्टी’ असे ठेवायला हवे, अशी खरमरीत टीका पवार यांनी यावेळी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post