कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकात टीपू सुलतान जयंती साजरी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने घेतला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कन्नड संस्कृती विभागाला यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजप आमदार के. जी. बोपय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला होता.

कडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाविना युद्ध केले होते. या युद्धात कडगु लोक मोठ्या प्रमाणात शहीद झाले होते, असे के. जी. बोपय्या यांनी नमूद केले.

दरम्यान, कर्नाटकात २०१५ मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने भाजपचा विरोध असताना टीपू सुलतान जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र, आता काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्या नंतर सत्तेवर आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post