देशभरात दहा बँकांचे विलीनीकरण : अर्थमंत्री


वेब टीम : दिल्ली
कॅनरा, युनायटेड, सिडिंकेट,आंध्रा बँकेचे विलीनीकरण करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

एकूण दहा बँकांचे विलीनीकरण होणार आहे असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी बँकांची संख्या २७ वरुन १२ वर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणतीही कपात केली जाणार नसल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

तसेच पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक सर्व निर्णय आम्ही उचलत आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करून पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही कसोशीचे प्रयत्न करत असल्याचे अर्थ मंत्री सीतारामन यांनी सांगितले.

निर्मला सीतारामन यांनी आठवडा पूर्ण व्हायच्या आतच दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर त्यांनी एनपीएचेही उदाहरण दिले.

एनपीए अर्थात थकीत कर्जांचे प्रमाण घटले आहे. थकीत कर्जांचे प्रमाण हे ८.६५ लाख कोटींवरुन कमी होत ७.९० लाख कोटींवर आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

बँकांना स्थिती सुधारण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बँकांना ५५,२५० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या माहितीनुसार
कोणत्या बँकांच्या मिळाली आहे हे बघूया.

बँक ऑफ बडोदा : ७००० कोटी
कॅनरा बँक : ६५०० कोटी
इंडियन ओव्हरसीज बँक : ३८०० कोटी
सेंट्रल बँक : ३३०० कोटी
इंडियन बँक : २५०० कोटी
युको बँक : २१०० कोटी
युनायटेड बँक : १६०० कोटी
पंजाब अँड सिंध बँक : ७५० कोटी

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार या बँकांचे विलीनीकरण होणार
१) इंडियन बॅक अलाहाबाद बँकेत
२) पीएनबी बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) युनायटेड बँक
३) युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेट बँका एकत्र येणार
४) कॅनरा आणि सिंडिकेट बँक एकत्र येणार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post