खुशखबर : भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले


वेब टीम : अहमदनगर
लाभक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात आवक वाढली असून आज (दि.३) रोजी दुपारी 2 वाजता धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याचे जलसंपदा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

दुपारी 2 वाजता धरणाचा पाणीसाठा 10500 दलघफू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरणातून सद्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3600 क्यूसेक असे एकूण 4425 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4500 दलघफू आहे. निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही.

धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, मागच्या वर्षी 9 ऑगस्ट ला धरण भरले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post