भूलभुलैय्या २ चे पोस्टर रिलीज


वेब टीम : मुंबई
अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव या कलाकारांच्या अभिनयाने गाजलेल्या भुलभुलय्या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल १३ वर्षांनी प्रदर्शित होत आहे.

हॉरर-कॉमेडी प्रकारच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

पुढच्या वर्षी ३१ जुलैला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येईल. कार्तिक आर्यन दुसर्या भागात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘भूलभुलैय्या 2’चा फर्स्ट लूक निर्माता भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बाज्मी करत आहेत.

‘१३ वर्षांनंतर… द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ या कॅप्शनसोबत पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. कार्तिकने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही फर्स्ट लूक पोस्ट केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post