देशभरात १५० ठिकाणी सीबीआयचे छापे


वेब टीम : दिल्ली
मोदी सरकारने हाती घेतलेल्या भ्रष्टाचार विरोधी विशेष मोहिम सध्या जोरदार सुरू आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून सीबीआयने देशभरातील १५० विविध सरकारी संस्थांच्या कार्यालयांवर अचानक छापे टाकले.

संभाव्य भ्रष्टाचाराच्या तपासणीसाठी या ठिकाणांवर छापे टाकल्याचे सीबीआयने म्हटले.

देशभरातील ज्या शहरांमध्ये सीबीआयने छापेमारी केली आहे त्यामध्ये दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, शिमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, पुणे, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, नागपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, डेहराडून आणि लखनऊ या शहारांचा समावेश आहे.

या शहरांमधील ज्या सरकारी कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली ती अशी कार्यालये आहेत जिथे सर्वसामान्य नागरिक किंवा छोट्या व्यावसायिकांना व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारामुळे सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post