वेब टीम : अहमदनगर कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही. याउलट पक्षाला नवीन नेतृत्व मिळते. जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. ते सत्तेचे लोणी ...
वेब टीम : अहमदनगर
कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही. याउलट पक्षाला नवीन नेतृत्व मिळते. जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. ते सत्तेचे लोणी चाखायला जात आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाची निष्ठा नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला. दरम्यान पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. त्यांनी आज नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना चाकणकर म्हणाल्या, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल आणि पुन्हा पक्षाला वैभव प्राप्त होईल. राज्यात पक्षाची ताकद निश्चित वाढलेली असेल. पक्षात सक्षम कार्यकर्ते-नेते आहेत. जी जागा रिकामी झाली, ती 12 तासांत भरली. जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत, ते सत्तेचे लोणी चाखायला जात आहेत. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही. याउलट पक्षाला नवीन नेतृत्व मिळते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. त्या गोष्टीकडे पाहण्यासाठी मुख्यमंत्री वेळ नाही पण दुसर्या पक्षातील नेते फोडण्यास त्यांना वेळ आहे. भाजपचे सरकार आल्यापासून महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आवाज उठवणार आहोत असे प्रदेशाध्यक्षा चाकनकर म्हणाल्या.