चिदंबरम यांना देश सोडण्यास मनाई, शुक्रवारी सुनावणी


वेब टीम : दिल्ली
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारात अडकलेले माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या अर्जावर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी करणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांची डोकेदुखी वाढलेली दिसते.

अंमलबजावणी संचालनानालयाने त्यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी केली. या नोटीशीद्वारे चिदंबरम यांना भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला असून देशाबाहेर जाण्यासाठी ईडीची परवानगी घेणे त्यांना बंधनकारक केल्याचे समजते.

ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाकडे पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश आहेत.

चिदंबरम यांचा मंगळवार संध्याकाळ पासून गायब आहेत. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला आहे.चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स गैरव्यवहा करून मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत एक टुमदार बंगला खरेदी केला.

त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात बऱ्याच ठिकाणी मालमत्ता खरेदी केली आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेल्या पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही तूर्तास दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले. गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post