तीनही सैन्यदलांचे नियंत्रण आता एकाच हाती; मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ची घोषणा


वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद अस्तित्वात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली. हे पद तिन्ही दलांचा सेनापती म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.

आमचे सामर्थ्य हिंदी महासागरा एवढे अथांग आहे. आमचे प्रयत्न गंगेच्या प्रवाहासारखे पवित्र आणि अखंड आहेत. आमच्या मुल्यांमागे हजारो वर्षाच्या संस्कृतीची प्रेरणा आहे, असेही त्यांनी म्हटले.

गेल्या ५ वर्षात आपल्या सरकारने रोज एक कायदा संपुष्टात आणला. जेणेकरून लोकांवरील ओझे कमी होईल. सरकारने १० आठवड्यात ६० कायदे संपुष्टात आणले.

भ्रष्टाचाराने देशाचे नुकसान केले. या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात एक देश एक संविधान याचा पुनरुच्चार केला. त्यांनी आपल्या भाषणात डिजीटल पेमेंट, आरोग्य, अर्थव्यवस्थेचा आदी मुद्यांचा उल्लेख केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post