पाच लाखाच्या डायमंड दागिन्यांसह आरोपी अटक ; एलसीबीची कारवाई


वेब टीम : अहमदनगर
लग्नसमारंभात चोरी करणारा पाच लाख रुपये किमतीचे डायमंड सोन्याच्या दागिन्यांसह आरोपीस अटक केली आहे सचिन सुधाकर पारखे (वय 34 रा.वांबोरी ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी दि.११ जुलै रोजी पत्नी कविता हिच्या बॅगमध्ये ठेवलेली पाच लाख रुपयांच्या रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची व डायमंड ची बिंदी चोरी केल्याप्रकरणी कन्हैयालाल नटवरलाल गांधी(रा. नवी पेठ मोती कॉम्प्लेक्स नगर अहमदनगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 ही चोरी सचिन पारखे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाली होती त्या माहितीच्या आधारे वांबोरी ता राहुरी गावात चर्च जवळ सापळा रचून सचिन पारखे याला पोलिसांनी पकडले. यावेळी त्याने सदर चोरी केल्याची कबुली दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post