क्षत्रीय वंजारी परिषदेच्या अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक


वेब टीम : अहमदनगर
क्षत्रीय वंजारी परिषदेचे अध्यक्ष महंत आजीनाथ महाराज आंधळे यांचे वर रविवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत शिवीगाळ व दमदाटी केली. परिस्थीतीचे गांभीर्य ओळखुन महंतांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ ठरला.

याबाबत पोलिसांकडे अदखल पात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.तालुक्यातील माणिकदौंडी येथील शंभो महादेव गडाचे मठाधिपती म्हणुन गेल्या २० वर्षापासुन आंधळे महाराज सेवाकार्य करतात. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जवळच असलेल्या भैरवनाथ यात्रे निमीत्त आयोजीत कस्त्यांच्या हंगाम्याचे नारळ फोडण्या साठी महाराज तेथे गेले होते.

काही वेळाने आज्ञात इसमाने त्यांची खुर्ची मागच्या बाजुने ओढली त्यामुळे महाराज खुर्चीवरून खाली पडल्याने गोंधळ सुरू झाला. परिस्थितीचा अंदाज पाहुन तेथुन निघुन जाण्यासाठी महाराज त्यांच्या  गाडीकडे गेले.

त्या वेळेस काही अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागे आले मारूती गाडीमध्ये बसुन जाताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने पाठीमागील काच व बाजुचा आरसा फुटला.

महाराज पळुन चालले म्हणुन काहीनी गाडीचा बोनेट चा भाग चेमटविला. शिवीगाळ दमदाटी व गाडीचे नुकसान झाल्याने महाराजांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलिस कर्मचारी सोमीनाथ बंगार करीत आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती कळताच परिषदेचे सर्व कार्यकर्ते जमले त्यांनी या घटनेचा निषेध करून महाराजांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.

पोलिस अधिकाऱ्यांनी आज दुपारी महाराजा बरोबर चर्चा करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी संभाजी पालवे , सुनिल पाखरे, अशोक आंधळे , राहुल कारखेले यांच्यासह माणिकदौडी पारिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान या घटनेची तालुक्यात चर्चा असुन या घटनेचा निषेध नोंदवत या प्रकाराची सखोल चौकशी करून  माणिकदौंडी येथील पोलीस औट पोस्ट त्वरित सुरू करावे अशी मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post