बांग्लादेशमध्ये बारा हजार रुग्ण डेंग्यूमुळे रुग्णालयात


वेब टीम : ढाका
बांग्लादेशात १२ ऑगस्ट पासून ते १८ ऑगस्ट पर्यंत बारा हजार डेंग्यूचे रुग्ण रूग्णालायात भरती झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. राजधानी ढाकामध्येच रुग्णालयात गेल्या आठवड्यात बरेच रुग्ण भरती झाले.

रविवारी संपूर्ण देशातील २४ तासांत ९७२ पैकी ७३४ रुग्ण केवळ ढाका मधीलच आहेत. तसेच आत्ताआत्तापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता बांग्लादेशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण झाले आहे.

बांग्लादेशातील फरीदपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाचशे खाटा असलेल्या रुग्णालयात आता ७५१ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी २७७ हे डेंग्यूचे रुग्ण आहेत.

रुग्णालायाचे मनुष्यबळ देखील अपुरे पडत आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक कमोदा प्रसोद सहा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post