केमिकल कंपनीत स्फोट, १० मृत्युमुखी, १० गंभीर


वेब टीम : धुळे
शिरपूरजवळील रुमित केमिकल्स कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात दहा जण मृत्युमुखी तर ४३ जण जखमी आहेत. यापैकी दहा जनांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हा स्फोट कशाचा होता, किंवा मृत्यू पावलेले ७ जण कामगार होते की अन्य कुणी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ही रासायनिक कारखाना शिरपूरजवळ वाघाडी गावाजवळ आहे.या केमिकल कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला.

 हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला मोठे हादरे बसले आणि स्फोटाचा आवाज सुमारे १५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. आसपासच्या शेतात काम करणारे काही शेतमजूरही या स्फोटामुळे जखमी झाल्याची चर्चा आहे.

या हादऱ्यांमुळे आसपासच्या घरांनाही तडे गेल्याचे समजते. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तसेच परिसरात धुरांचे लोटही वाढत आहेत.

आता पर्यंत चार बॉयलर फुटले
या घटनेत कारखान्यातील सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचा स्फोट झाला आहेत. सुरक्षेच्या कारणाने आजुबाजूच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post