ना. गिरीश महाजनांचा एक फोन आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे उपोषण मागे


वेब टीम : अहमदनगर
साकळाई योजनेसाठी अभिनेेत्री दिपाली सय्यद यांनी सुरू केलेल्या उपोषण मंत्री गिरीष महाजन यांच्या आश्वासनानंतर रविवार (दि.११) मागे घेण्यात आले. उपोषणाला पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट देत मंत्री महाजन सय्यद याचे संभाषण करून दिले.
नगर आणि श्रीगोंद्याला वरदान ठरणारी साकळाई योजनेसाठी अभिनेेत्री दिपाली सय्यद यांनी सुरू केलेल्या उपोषण मंत्री गिरीष महाजन योजनेबाबत दोन दिवसात अधिका-यांची बैठक लावण्यात येईल, तरी विनंतीने आपले उपोषण मागे घ्या, असे संभाषण भ्रमणध्वनी वरुन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन करून दिले. महाजन यांच्या आश्वासनानंतर रविवारी सय्यद यांंना दिले आहे.

नगर  व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज मागे घेण्यात आले.
पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी पूरपरिस्थितीनंतर आपण साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.

सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले होते. योजनेस मंजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला होता.1 सप्टेंबरपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 2 सप्टेंबरपासून पुन्हा याचठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.

 आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी त्यांची प्रकृती खालवली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, शासकीय कार्यालयांना लागोपाठ तीन दिवस सुट्ट्या आले. दुसरा शनिवार, रविवारी आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू केलेले उपोषण आंदोलन किती दिवस चालणार याबाबत उत्सुकता होती. त्यातच त्यांची आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी खालावल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
वैद्यकीय अधिकार्‍यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना ऊर्जा टिकून ठेवण्याची न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दिपाली सय्यद या आंदोलनस्थळी कोणाशीही बोलत नव्हत्या. हातवारे किंवा इशार्‍याने बोलतात. कोणी बोलत असल्यास फक्त ऐकून घेतात. तोंडावर बोट ठेवून, दिपाली सय्यद शांत बसतात. दिपाली सय्यद यांचे एकप्रकारे आंदोलनस्थळी मौनव्रत सुरू केले. दिपाली सय्यद यांच्या या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. परंतु सण-उत्सवामुळे सध्या जिल्हा परिषदेतील आंदोलनस्थळी दिपाली सय्यद आणि बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते होत. जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे, ज्येष्ठ नेते दादापाटील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी व अन्य सिने कालाकरांनी सय्यद यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post