दहशतवाद्यांना मदत भोवली ; पाकड्यांना टाकले काळ्या यादीत


वेब टीम : वॉशिंग्टन
आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्स’ (FATF) या संस्थेच्या एशिया पॅसिफिक गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. यापूर्वी FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवले होते.

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की एएफटीएफच्या एशिया पॅसिफिक गटाने जागतिक मापदंड पूर्ण करु न शकल्याने पाकिस्तानला यादीत टाकले आहे.

आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित ४० निकषांपैकी ३२ निकष पाकिस्तानने पूर्ण केले नाहीत.

काळ्या यादीत नाव आल्यानंतर आता पाकिस्तानला जगाकडून कर्ज घेण्यास आणखी अडचणी येणार आहेत.

एफएटीएफने शुक्रवारी सांगितले,”पाकिस्तान टेरर फंडिंगसंदर्भात आपला कृती आराखडा पूर्ण करण्यात अपयशी ठरला.

यासाठी पाकिस्तानला जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पाकने मे २०१९ पर्यंत देखील आपले काम पूर्ण केलं नाही.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post