जनावरांचे हाल पहावले नाही; चारा छावणी नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या


वेब टीम : अहमदनगर
घोसपुरी (ता. नगर) येथील वसंत सदाशिव झरेकर या शेतकऱ्यांने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊन देखील चारा छावण्या सुरू न झाल्याने ही आत्महत्या केल्याचे सांगितले जाते आहे.

या आत्महत्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विष प्राशन केल्यानंतर या शेतकऱ्यांला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी झरेकर यांना पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.

यावेळी शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले होते.चारा छावणी सुरू न करणार्‍या अधिकार्‍यांवर झरेकर यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश कार्ले यांनी केली आहे. गुन्हा न दाखल झाल्यास मृतदेह ताब्यात न घेता जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासन शेतकर्‍यांसाठी आहे की, त्यांचा बळी घेण्यासाठी, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post