आता काश्मीरमध्ये सुरू होणार फर्ग्युसन आणि व्हीआयटी


वेब टीम : पुणे
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत होताना आता शैक्षणिक संस्था देखील काश्मीरमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्रातील सात प्रसिद्ध शैक्षणिक संस्था लवकरच काश्मीरमध्ये महाविद्यालाये सुरु करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये फर्गसन व व्हीआयटीसारख्या शैक्षणिक संस्था उत्सुक आहेत.

या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सरहद या पुण्यामधील स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधत आपण काश्मीरमध्ये कॉलेज सुरु करण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.

सरहद ही स्वयंसेवी संस्था गेल्या दोन दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी काम करत आहे.

कलम ३७० रद्द केल्यापासून केंद्र सरकार खोऱ्यात खासगी कंपन्या गुंतवणूक करतील आणि यामुळे आर्थिक पाठबळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

सरहदचे प्रमुख संजय नाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही २००४ पासून प्रयत्न करत आहोत. मुफ्ती मोहम्मद सईद सरकारकडे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी कॉलेज सुरु करावीत यासाठी आम्ही जमीन मागितली असल्याचे सांगितले.” 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post