नगर शहरात भरदिवसा घरफोडी


वेब टीम : अहमदनगर
बंगल्याचा कडीकोएंडा तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. आतील कपाटातील 1 लाख 29 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना बुधवारी (दि.28) सकाळी 10 ते दुपारी 3.30 च्या दरम्यान बोरूडे मळा, बालिकाश्रम रोडवर घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नामदेव बाजीराव वायाळ (वय 39, रा. ‘अमृत कलश’ डी-11, बोरूडेमळा, बालिकाश्रम रोड) हे काही कामानिमित्त घराला कुलूप लावुन कुटूंबासह कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोराने बंद बंगल्याचा कडीकोएंडा तोडून घरात प्रवेश केला.

आतील सामानाची उचकापाचक करीत कपाटातील 1 लाख 29 हजार 500 रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी नामदेव वायाळ यांच्या फिर्यादीवरून भादंविक 454, 380 अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक पांढरे या करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post