गोपीनाथ मुंडेनंतर भाजपात कार्यकर्त्याना न्याय देणारा नेताच उरला नाही


वेब टीम : अहमदनगर
 स्व.गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे आणि वंजारी समाजाचे महाराष्ट्राचे एक कणकर नेते होते. त्यांच्या माध्यमातुन वंजारी समाजाला आणि सामान्य जनतेला न्याय मिळत होता. आज खरतर पाहिले अटल बिहारी वाजपायी यांच्या वेळेची भाजप आता राहिली नाही.

मी नगर जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जोगेवाडी गाव (ता.पाथर्डी) चे सरपंच तसेच पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणुन 10 वर्षे काम केले. वंजारी समाजसेवा संघ अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्षपण होतो, असे दत्तात्रय आंधळे म्हणाले.

आजच्या नगर जिल्हयाच्या भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना न्यायच मिळत नाही. एकनिष्ठ कार्यकर्ता असूनही त्याला अन्यायाला सामोरे जावे लागते. म्हणुन आज मी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या कार्याला व त्यांची कार्यकर्त्यासाठी असणारी तळमळ पाहुन प्रेरित झालो आणि शिवसेनेत प्रवेश केला. कारण गोपीनाथ मुंडे नंतर भाजपात कार्यकर्त्यांना न्यायच देणारा नेताच उराला नाही, असेही श्री. आंधळे म्हणाले.

भाजपा युवा मोर्चाचे माजी उपजिल्हाध्यक्ष दत्तात्रय आंधळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, त्यांचे स्वागत करून त्यांना उपशहर प्रमुखपदी नियुक्तीचे पत्र शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच शिवसेना आघाडीच्या शहरप्रमुख पदी रामदास मोरे, उपशहर प्रमुखपदी शांताराम जिवडे, सचिवपदी संजयकुमार वाकचौरे, खजिनदारपदी रावसाहेब मोरे, वाहतुक सेना उपशहरप्रमुख पदी संतोष डमाळे, शिवसेना उपशहर प्रमुख पदी दिपक भोसले यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी दिलीप सातपुते, गिरीष जाधव, शशिकांत देशमुख, शिरीष जाणवे, विशाल साबळे, तुकाराम मिसाळ आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post