डेंग्यू, दमा, कर्करोगावर गुणकारी ‘ड्रॅगन’ फळ


वेब टीम : पुणे
बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीचे आजार वाढले आहेत. डॉक्टरही काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पेशी वाढवणे, डेंग्यू, दमा, कर्करोग आदी आजारावर गुणकारी फळ म्हणून ड्रॅगची फळाची ओळख आहे. त्यामुळेच पुणेकर या फळाला खरेदीसाठी पसंती देत आहेत. या फळाचा हंगाम सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. फळ बाजारात या फळाची रोज 8 ते 10 टनाची आवक होत आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, पुणेू जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागातून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. पांढर्‍या रंगाच्या ड्रॅगनला प्रतीकिलोस 30 ते 100 रुपये भाव मिळत आहे. तर लाल रंगाच्या ड्रॅगनला 50 ते 150 रुपये प्रतिकिलोस भाव मिळत आहे़ लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल रंगाच्या ड्रॅगनला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे.

व्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून याचे पिक घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post