चार दहशतवादी भारतात; गुजरात, राजस्तानमध्ये हाय अलर्ट


वेब टीम : दिल्ली
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतात शिरल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर गुजरात आणि राजस्तान या दोन राज्यांसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी केला आहे.

 हे दशतवादी अफगाणिस्तानचा पासपोर्ट वापरून भारतात शिरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसल्याचे राजस्तानचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी सांगितले.

तसेच कोणत्याही क्षणी ते घातपात घडवू शकतात,असे ही त्यांनी नमूद केले.या संदर्भात एक पत्र जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना पाठवले आहे.

पत्र मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे, हॉटेल्स, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांमध्ये तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत.

या व्यतिरिक्त संशयित वाहने आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post