आमच्याकडेही अण्वस्त्रे, आता संवाद अशक्य : इम्रान खान बरळले


वेब टीम : इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारत सरकारशी संवाद शक्य नाही. दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे लढाई झाली तर धोका वाढत जाईल, असे सांगितले आहे.

न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेतील दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांच्यासोबतच पाकचे अन्य मंत्रीही युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहेत.

आम्ही भारताशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. त्यात कुठलीच कसर ठेवली नाही. मात्र भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना संवाद ठेवण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे. असे वक्तव्य त्यांनी केले.

भारतव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करावा लागत आहे. भारतीय सैन्यदलांनी नागरिकांना त्यांचे धार्मिक सणही साजरे करु दिले नाहीत. भारत त्यांचे मूलभूत हक्क व स्वातंत्र्यही नाकारत आहे, अशा आशयाचे ट्विटही त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post