वेब टीम : मुंबई माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ य...
वेब टीम : मुंबई
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ या सिनेमांमुळे चर्चेत आलेले रितेश बत्रा या सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.
ही वेब सिरीज लेखिका सागरिका घोष यांच्या ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित असणार आहे. वेब सिरीजच्या निर्मितीसाठी विद्या बालनने पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत.
मोठ्या पडद्यावर अनेक उत्तम भूमिका साकारल्यानंतर विद्या पहिल्यांदाच वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.
‘माझी पहिलीच वेब सिरीज आहे. रॉनी स्क्रूवाला याची निर्मिती करत असून आम्ही सगळेच या पुस्तकाचा आणि विषयाचा अभ्यास करत आहोत. वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती मिळवत आहोत.
हे काम प्रचंड मेहनतीचं असल्याने याला थोडा वेळ लागणे साहजिक आहे.’ अशी प्रतिक्रिया विद्याने दिली.