तटरक्षक दलाच्या जहाजाला भीषण आग, २३ बेपत्ता


वेब टीम : विशाखापट्टणम
तटरक्षक दलाच्या जहाजाला आग लागली आहे.जहाजाला खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. यापैकी २८ जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे.

बेपत्ता खलाशाचा शोध सध्या सुरु आहे. व्हिडीओमध्ये जहाजाला भीषण आग लागल्याचे आणि धूर येत असल्याचं दिसते.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,सकाळी साडे अकराच्या सुमारास गस्ती पथकातील या जहाज कोस्टल जग्वारला ही आग लागली होती. आग लागण्यापूर्वी एका स्फोटाचा आवाज आला. यावेळी जहाजावर असणाऱ्या खलाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या घेतल्या.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून जवळ असणारे तटरक्षक दलाच्या जहाजाला बचावकार्यासाठी पाठवले गेले. बचावकार्याचा व्हिडीओ समोर आला असून खलाशांना वाचवताना दिसत आहे. २८ जणांना वाचवण्यात यश आले असून एकजण बेपत्ता आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post