हिंसाचार वाढला; काश्मीरच्या काही भागात पुन्हा निर्बंध


वेब टीम : श्रीनगर
शनिवारी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनांनंतर रविवारी श्रीनगरमधील काही भागांत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत.

हज यात्रेकरूंची पहिली तुकडीही सौदी अरेबियावरुन परतली आहे. काश्मीर खोऱ्यातील काही भागांत १४व्या दिवशीही निर्बंध कायम असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

शनिवारी जवळपास १२ ठिकाणांवर निदर्शने करण्यात आली ज्यात काही जण जखमी झाले. परंतु, जखमींची नेमकी संख्या कळु शकलेली नाही.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागांवर पुन्हा निर्बंध घालण्यात आले. हज यात्रेकरूंची पहिली तुकडी आज श्रीनगर विमानतळावर दाखल झाली.

त्यांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसचा ताफा तैनात करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबातील यात्रेकरूंना न्यायला येण्यासाठी कुटुंबातील फक्त एका सदस्याला परवानगी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates