जायकवाडी धरणग्रस्त क्षेत्रातील पिके पाण्याखाली


वेब टीम : औरंगाबाद
नाशिक, त्र्यंबकेश्वर परीसरात झालेल्या जोरदार व विक्रमी पावसामुळे गोदावरी नदीला महापुरु येऊन अवघ्या पाच दिवसाच्या आत जायकवाडी जलाशयाचा जल फुगवटा वाढल्याने मोठा पाणीसाठा धरणात झाला आहे. वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीची जलपातळी झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांनी धरणग्रस्त शेतात थोड्याशा पावसावर पेरलेल्या कपाशी, तूर, मूग व मोठ्या प्रमाणात पेरलेल्या चारा पिकात धरणाचे पाणी शिरले असून ही पिके पाण्याखाली गेली आहेत.

या वर्षी धरणाचे संपूर्ण संपादित क्षेत्र रिकामे झाले होते. मागिल वर्षी अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यात पाणी व चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गाळपेरीनंतर जुन मधे झालेल्या सुरवातीच्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी या परीसरात मोठ्या प्रमाणात कडवळ, मका हि चारा पिके पेरली होती.

तर कपाशी, तूर मूग, बाजरी आदि पिकांचा बऱ्यापैकी पेरा केला होता. मात्र पेरणी नंतर पाऊसच झाला नसल्याने या पिकाची वाढ योग्य रीतीने झाली नसली तरी चारा पिकाची वाढ जनावरांना खाण्यायोग्य झाली होती मात्र जायकवाडीचा जल फुगवटा जस जसा वाढत आहे तसतशी ही पिके पाण्याखाली जात असून परीसरातील शेतकऱ्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावनार आहे. या परीसरातील उपसा जलसिचंन योजनेच्या ( बॅक वॉटरवरील ) विद्युत मोटारी जॅकवेलवर ठेवण्यात आल्या आहेत.

आता याच पाण्यावर या परीसरातील अवलंबून असलेल्या शेतीत पाणी जाणार आहे मात्र उन्हाळ्यात वीजपुरवठा चार तासाने कमी करण्यात आला होता. तो पुर्ववत आठ तास करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे. यंदा धरण पुर्ण क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज असुन धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणी योजना व कालवा पाणी समस्या सुटणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post