राम शिंदे- रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर


वेब टीम : कर्जत
विधानसभा निवडणूक ही दोन अडीच महिन्यांवर येऊन ठेपली.त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी त्या – त्या मतदारसंघात संपर्कला सुरुवात केली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात आतापासून वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने भाजपकडून “आमचं ठरलं पुन्हा राम शिंदेच’. राष्ट्रवादीकडून “रोहित पवार मिळून आपण घडवू नवे पर्व’ या नावाचे स्टिकर मोठ्यासह लहान गाड्यावर लावून एकप्रकारे प्रचारालाच सुरवात केली आहे. कर्जत जामखेड मधील पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची संभाव्य लढत होणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दोघांकडून विधानसभा मतदारसंघ निवडणुकीवर डोळा ठेवून जनसंपर्कात वाढ केली असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. ना. शिंदे व पवार यांच्यामुळे मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसायला सुरवात केली. विद्यमान आमदार व मंत्री राम शिंदे यांची कर्जत जामखेड तालुक्‍यासाठी भरपूर निधी आणून अनेक मोठे काम मार्गी लावले आहेत.

70 वर्षानंतर कर्जत जामखेड मतदार संघाला थेट मंत्री पदाच्या संधी मिळाली. त्यामुळे या संधीचा ना. शिंदे यांनी मंत्रीपदाच्या काळात जनतेसाठी कोट्यवधींची निधी आणला. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक प्रश्‍न मार्गी लागले. भाजपने आमचं ठरलं पुन्हा राम शिंदेच आमदार असे घोष वाक्‍यचे स्टिकर गाड्यावर लावणे सुरु केले आहे. त्यातच आता रोहित पवार हे गेल्या दोन वर्षांपासून कर्जत-जामखेड मध्ये पक्षाचे आणि वैयक्‍तिक उपक्रम राबवत आहेत. मात्र इथेच लढणार असल्याची माहिती त्यांनी कधीही स्पष्टपणे दिली नव्हती. दुसरीकडे पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्येही त्यांनी चाचपणी केली होती. पण अखेर त्यांनी सर्व बाबतीत सुरक्षित असलेल्या कर्जत जामखेडची निवड केली आहे.

कर्जत जामखेड मतदार संघात बारामती ऍग्रोमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून दुष्काळात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, मुलींसाठी सिनेटरी नॅपकिन उपक्रम, मुलींना दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचे प्रश्‍न मार्गी लावले. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करणे चालू झाले आहे.

उमेदवारी निश्‍चित करण्याबरोबरच एकगठ्ठा मतदान कसे मिळविता येईल, यासाठी आता या इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात असून, त्यासाठी विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित व्यक्‍ती, विविध समाजांच्या संघटनांशी या इच्छुकांनी चर्चा सुरू केल्या असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपकडून आमचं ठरलं पुन्हा राम शिंदेच.. राष्ट्रवादीकडून रोहित पवार मिळून आपण घडवू नवे पर्व या नावाचे स्टिकर मोठ्यासह लहान गाड्यावर लावून एकप्रकारे प्रचारालाच सुरवात जाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post