मलिदा खायला मिळात नसल्याने मला टार्गेट केले जाते - जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे


वेब टीम : अहमदनगर
संबंधितांना मलिदा खायला मिळात नाही. तसेच या ठिकाणी प्रत्येक काम नियमाप्रमाणे काम करत आहे. यामुळेच मला  क्रीडा संघटनांनी मला टार्गेट केले आहे. शालेय क्रीडा स्पर्धाही नियमित सुरू असून मी कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे  जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी बुधवारी (दि.१४) सांगितले.

नावंदे म्हणाल्या की, ‘स्थानिक स्तरावर उत्पन्न वाढवावे असे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी ५०, तर नागरिकांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क घेत आहे.’ आजपर्यंतचा जमा-खर्च  विचारला असता त्या म्हणाल्या की, पूर्वीची माहिती कशी देणार ? मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचा विषय माझ्या नियंत्रणात येत नाही.

त्यामुळे किती खेळाडू येतात हे कळत नाही, असे सांगत त्यांनी ६०-४० च्या विषयाला बगल दिली. क्रीडा संकुलातील असुविधेबाबत कोणत्याच संघटनांनी लेखी पत्र दिले नाही. लेखी पत्रानंतर सुविधा देऊ.  संघटनांनी मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे.

शालेय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा वेळेवर झाल्या आहेत. कोणत्याही स्पर्धा झालेल्या नाहीत म्हणून बदलीसाठी आंदोलन झाल्याचे बातम्यांतून समजले, असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post