पनामा पेपर लीक घटनेवर येणार चित्रपट


वेब टीम : दिल्ली
पनामा पेपर लिक प्रकरणावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. स्टीव्हन सोडरबर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘लॉन्ड्रोमॅट’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

‘लॉन्ड्रोमॅट’ हा चित्रपट वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल सोबतच अन्य फिल्म फेस्टीव्हल्समध्ये प्रदर्शित करणार आहे. हा चित्रपट १ नोव्हेबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासात सर्वात मोठे ठरावे असे ‘पनामा पेपर्स’ प्रकरण २०१६ मध्ये जगासमोर आले होते. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य अमेरिकेतील पनामा या देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड केली होती.

त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटू आणि बरेच बड्या असामींनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेटे अशा कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात पैसा कसा फिरवला गेला याबाबत धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post