वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’


वेब टीम : मुंबई
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे  उद्या दि. 7 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह ‘महा ई –संवाद’ साधणार आहेत.

राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी श्री. मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे  www.parthlive.com  या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

…. म्हणून ग्रामपंचायतींशी संवाद

जिल्ह्याचे हरित क्षेत्र 33 टक्के करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी वृक्षलागवड आणि संगोपन या कार्याला महत्त्व द्यावे, जिल्ह्याच्या विकास आराखड्याप्रमाणे जिल्ह्यांचा वृक्ष आराखडा तयार करावा अशा सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्याचे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात  एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. 2 टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये चार जिल्ह्यांचा समावेश होतो, तीन टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र असलेला एक जिल्हा आहे तर दहा टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र असलेले राज्यात 8 जिल्हे आहेत.

वातावरणीय बदलांच्या परिणामांना यशस्वीपणे सामोरे जाताना या जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणूनच आपण  दि. 7 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post