दिव्यांगांच्या बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशी ठरली विश्वविजेती


वेब टीम : बासेल
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने पटकावले.

याचवेळी पार पडलेल्या दिव्यांगांच्या पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत भारताच्या मानसी जोशीनेही सुवर्णपदक पटकावले आहे.

मानसीने अंतिम सामन्यात भारताच्याच पारुल परमारचा २१-७, २१-१२ असा पराभव केला. विजेतेपद पटकावल्यानंतर मानसीने स्वप्न पूर्ण झाल्याची भावना वक्त केली.

२०११ मध्ये एका अपघातात मानसीला आपला एक पाय गमवावा लागला होता. त्यानंतर प्रोस्थेसिस पायाच्या साहाय्याने तिने २०१५ पासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.

ती पुलेला गोपीचंद अकादमीत सराव करते. भारतीय पॅरा संघाने या स्पर्धेत तब्बल १२ पदके कमावली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post