हिम्मत तर पहा, चक्क पोलिस ठाण्यातच हाणामारी : १२ जणांवर गुन्हे


वेब टीम : पाटोदा
गल्लीत भांडणे करून त्याची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट पोलिस ठाण्यात गेले, मात्र या ठिकाणी पोलिसात तक्रार देण्याऐवजी ठाण्यातच एकमेकांवर हात उचलत मारामारी करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की केली. म्हणून पोलिसांनी तब्बल बारा जणांविरोधात कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. सदरची घटना ही पाटोदा शहरातली असून यातील दोन्ही गट हे भीमनगर भागातले रहिवासी आहेत.

पाटोदा शहरातील भीमनगर भागात राहणारे आडागळे-जावळे हे दोन गट किरकोळ कारणावरून वाद करत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये भांडणे झाली. हे दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये आले.

मात्र या ठिकाणी या दोन्ही गटांनी ठाण्यातच एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की केली.

म्हणून पोलिस नाईक शरद कैलास टेकाळे यांच्या फिर्यादीवरून नरेंद जावळे, सुरज विलास जावळे, आमंत सतीश जावळे, विशाल जावळे, रोहन जाधव, सुभाष महादेव आडागळे, अविनाश, बलभीम सुभाष आडागळे, रवि क्षीरसागर, सुरेश भागुजी आडागळे यांच्या विरोधात फिर्याद देऊन कलम ३५३, ११०, ३३५ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post