आता माघार नाही, मनसेने बजावली चक्क ईडीला नोटीस


वेब टीम : मुंबई
अंमलबजावणी संचनालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना समन्स बजावले होते.

यामुळे गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात काल ईडीने राज यांची सलग ९ तास चौकशी केली.

राज यांना नोटीस पाठवल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

आज मात्र मनसेनेच ईडीला नोटीस पाठवली आहे. ईडीच्या कार्यालयाचा फलक हिंदीत असल्याने मनसेने ईडीवर निशाणा साधला आहे. शासकीय फलक मराठीत नसल्याने मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post