स्वराज यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले


वेब टीम : दिल्ली
भारतीय राजकारणातील झळाळता अध्याय संपला आहे. पक्षीय राजकारणापेक्षा त्यांनी नेहमीच देशहित पाहिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.

सुषमा स्वराज या उत्कृष्ट वक्तव्या, उत्स्कृष्ट खासदार होत्या. भाजपची विचारसरणी वाढवण्यामागे त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी सांभाळलेल्या मंत्रालयामध्ये जीव ओतून काम केले.

विविध देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. जगातीत प्रत्येक भारतीय नागरिकाला मदत करण्यात त्या तत्पर होत्या, अशा शब्दांनी मोदींनी स्वराज यांचे कौतुक केले.

तब्येतीची कुरबूर सुरू असतानाही त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कारभार समर्थपणे सांभाळला. त्यांची काम करण्याची भावना अद्वितीय होती.

त्यांच्या जाण्याने पक्षासह व्यक्तीगत हानी झाली आहे. देश त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल, असे म्हणत मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post