मुळा धरणातून कालव्यांना पाणी सुटले, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा


वेब टीम : अहमदनगर
राहुरीच्या मुळा धरणातुन उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेञासाठी आमदार शिवाजी कर्डीले,आमदार बाळासाहेब मुरकुटे,आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते धरणावरील मोटरपंपाची कळ दाबुन आज सायंकाळी ६ वाजता पाणी सोडण्यात आले.

कोतुळ कडुन मुळा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने लाभक्षेञातील शेतक-यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.या मागणीची दखल घेऊन आज सोमवारी  सायंकाळी उजवा व डावा कालव्यातुन पाणी सोडण्यात आले.

आमदार कर्डीले म्हणाले की निसर्गाच्या कृपेने ऑगष्ट पासुन मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे.धरणाचा पाणीसाठा १९ हजार ५०० दशलक्ष घनफुट झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान धरणात पाण्याची आवक सुरू असली तरी लाभक्षेञात दमदार पाऊस नसल्याने उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेञासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लवकरच वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिली.

यावेळी राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे, भा ज प तालुका अध्यक्ष , विक्रम तांबे, भेंडा जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,अशोक मिसाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण मोरे,सहाय्यक कार्यकारी अभियंता सायली पाटील,शाखाधिकारी आण्णासाहेब आंधळे पाटबंधारे, नारायण तमनर, कर्मचारी, लाभक्षेञातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post