मुळा धरणातून जायकवाडीकडे झेपावणार पाणी


वेब टीम : अहमदनगर
मुळाधरण आज रोजी तेवीस हजार पाचशे दश लक्ष्य घनफुट भरल्याने मुळानदी पात्रातुन जायकवाडीला चार हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे.


तरी मुळानदी पात्रातील केटीवेयर च्या फळ्या काढण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. सदर नदी काठच्या शेतकर्‍यांना धरणावरील सायरण वाजवुन इशारा देण्यात येणार आहे.


तरी नदी काठच्या बा.नांदुर ड्रिग्रस, राहुरी खुर्द, देसवंडी, तांदुळवाडी, आरडगाव, शिलेगाव, वळण, मांजरी गावच्या शेतकर्‍यांनी आपल्या विद्युत मोटारी, नुकसान होणार्‍या वस्तु , तसेच नदी पात्रातुन पाणी सुरु असतानां ये जा टाळावी. तसेच शाळकरी मुले जणावरे यांची काळजी घ्यावी असे आव्हान अहमदनर चे मुळाधरण आभियंता रावसाहेब मोरे यांनी आव्हान केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post