मुळा उजव्या कालव्याला भगदाड; ८ दिवसांसाठी आवर्तन बंद


वेब टीम : अहमदनगर
मुळा ऊजवा कालवा ऊंबरे गावाजवळ भगदाड पडून फुटला असून सध्या सुरू असलेले आवर्तन आज सायंकाळी साडेसात वाजता तातडीने बंद करण्यात आले आहे.

मुळा उजवा कालवा फुटला नसून तो जाणीव पूर्वक फोडला असल्याची शक्यता आहे.

मुळा धरणातून उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे.हा कालवा दुरूस्ती साठी जवळ पास 8 दिवसांचा कालावधी लागणार असून यामुळे राहुरी, नेवासा,शेवगाव,पाथर्डी तालुक्यातील शेतकरी आणि शेती अडचणीत सापडला आहे.

मुळा उजवा कालवा लाभ क्षेत्रात पाऊस नसल्याने पिकांसाठी कालव्यातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

त्याच बरोबर मुळा नदीतून विसर्ग सोडण्यात आलेला असताना मुळा उजव्या कालव्याचे पाणी पट्टी घेऊन टेल टू हेड आवर्तन सुरू असल्याने गावोवावतील बंधारे भरून देण्यास पाटबंधारे खाते नकार देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण होत आहे.

धरण उशाला आणि कोरडा घशाला अशी परिस्थितीत निर्माण झाल्याने पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी यांच्यात खटके उडत आहेत.अशा पार्श्वभूमीवर उजवा कालवा फुटला की फोडला अशी शंका निर्माण झाली आहे.

या कालवा फुटीचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates