जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अखेर बदली


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा परिषदेतील वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांची अखेर बदली करण्यात आली.

शिक्षक बदली प्रकरणावरून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांचा त्यांच्यावर रोष होता व त्यातूनच त्यांच्यावर अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला होता.

माने यांच्या जागेवर सीडकोचे जॉईन्ट एमडी श्री. एस. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाच्या मुख्य अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. माने यांना तातडीने नवा पदभार स्वीकारण्याचे आदेश आहेत. बदलीचे आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.

बदली प्रकरणावरून झेडपी पदाधिकारी आणि सीईओ माने यांच्यात वाद रंगला होता. अध्यक्षा शालिनीताई विखे आणि सभागृहाने त्यांच्यावर अविश्वास आणून पारित केला होता. त्यानंतरही माने नगर झेडपीत रुजू झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post