पाकिस्तानचा ‘समुद्री जिहाद’ कट, नौदल हाय अलर्टवर


वेब टीम : मुंबई
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तानने भरपूर आगपाखड केली आहे. त्यातच पाकमधील दहशतवादी संघटना ‘समुद्री जिहाद’चा कट रचत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला हायअलर्ट देण्यात आला आहे.

तसंच कुठल्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं नौदलानं म्हटलंय.
‘समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी समुद्रात बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. नौदलाला सर्व तळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असं भारतीय नौदलाचे व्हाइस ऍडमिरल मुरलीधर पवार यांनी सांगितलं.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना, ‘पाकमधील दहशतवादी संघटना आपल्या हस्तकांना ‘समुद्री जिहाद’ म्हणजेच समुद्र मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post