न्यूझीलंडच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट


वेब टीम : मुंबई
न्यूझीलंडच्या उच्चायुक्त जोनाना केम्पकर्स यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेतली. महाराष्ट्र आणि न्यूझीलंडमध्ये व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानमंडळाची कामकाज पद्धत आणि न्यूझीलंडच्या संसदीय कामकाज पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण झाली. यावेळी विधानमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे, विधानसभा अध्यक्षांचे खाजगी सचिव राजकुमार सागर, विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते.

विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन श्री. बागडे यावेळी म्हणाले, न्यूझीलंडमध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातही दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी काय करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

श्रीमती केम्पकर्स यांनी न्यूझीलंडमध्ये बॉलिवूड सिनेमांना प्रेक्षक गर्दी करतात असे सांगितले. महाराष्ट्र आणि न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या काळात सांस्कृतिक, पर्यटन, चित्रपट क्षेत्रात देवाणघेवाण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post