गरज पडल्यास अण्वस्त्र धोरण बदलू : राजनाथ सिंह


वेब टीम : पोखरण
आत्तापर्यंत स्वतःहुन अण्वस्त्रांचा वापर करायचा नाही हे भारताचे धोरण होते. परंतु, भविष्यात मात्र परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतो.’ असे वक्तव्य भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते पोखरणमध्ये आले होते.

‘आंतरराष्ट्रीय आर्मी स्काऊट मास्टर्स स्पर्धेसाठी मी जैसलमेर येथे आलो होतो. योगायोगाने आजच अटलजींची पहिली पुण्यतिथी आहे.

त्यामुळे मी विचार केला की त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोखरणच्या भूमी इतकी योग्य जागा नाही.’ असे ते म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post