ईडीचे चिदंबरम यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


वेब टीम : दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.हे समन्स हवाई उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बजावले आहे.

२००८-०९ दरम्यान हा गैरव्यवहार झाला होता. एअर इंडिया तोट्यात असतानाही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर हवाईमार्ग तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते असा आरोप त्यांच्यावर आहे.

ईडीकडून २३ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

यापूर्वी पी चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि एअरसेल मॅक्सिस घोटाळ्या प्रकरणीही ईडीने चौकशी केली.

या प्रकरणी पी चिदंबरम यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या काळात एअर इंडियासाठी १११ विमानांची खऱेदी झाली होती.

तत्कालीन नागरी उड्डाण खात्याचे मंत्री प्रफुल्ल पटेल यांची जून महिन्यात चौकशी झाली होती. यावेळी त्यांनी चिदंबरम प्रमुख असलेल्या मंत्र्यांच्या गटाकडून खरेदीची परवानगी दिल्याची माहिती समोर आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post