विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे 'हा' उमेदवार?


वेब टीम : अहमदनगर
शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर विधानसभा मतदारसंघातून विजय औटी यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे आणि तसे संकेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा सुरू केलीय, भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवनेरीवरुन करण्यात आली. या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एका सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.

तुमच्या मनातील व्यक्तीला उमेदवारी देणार'

"पारनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी म्हणतात की पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत. या मतदारसंघांचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी आता पारनेरकरांवर आहे. तुमच्या मनातील उमेदवाराला मी नक्कीच उमेदवारी देईल काळजी करू नका" असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. स्वत: अजित पवार यांनीच आता निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार यांनी म्हटलं की, "पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलेश लंके यांनी अनेक बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न केले त्यामुळे मी पारनेरकरांच्या मनातील उमेदवाराला उमेदवारी देणार आहे. तुम्ही काळजी करू नका फक्त देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्याने कुठंही वाद घालत बसू नका. आपल्याला सर्वांना मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आणायचं आहे.


संदेश कार्ले यांचा औटींना धोका!
गेल्या पंचवार्षिक पासून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातून तयारी सुरू केली आहे. तसेच गेल्या वेळेस त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संदेश कार्ले यांनी पक्षाकडे उमेदवारी माहिती आहे. उमेदवारी करण्याच्या दृष्टीने संदेश कार्ले समर्थकांनी तयारी सुरू केली आहे. नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील गावांमध्ये कार्ले यांचा दांडगा संपर्क आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणारच असल्याचा दावा कार्ले समर्थक करत असून ते कोणाला झेंडा हाती घेऊन कोणाला धक्का देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates