सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी २३ ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत


वेब टीम : मुंबई
संचालक, लेखा व कोषागारे यांच्यामार्फत राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  या पेन्शन अदालतीकरिता महालेखाकार, मुंबई आणि नागपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई येथे शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० ते पूर्ण दिवस पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील पेन्शन अदालत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी , मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित होईल. तर नागपूर येथील पेन्शन अदालत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत साई सभागृह, शंकर नगर, अंबाझरी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

महालेखाकार, मुंबई कार्यालयामार्फत प्राप्त झालेली प्रलंबित निवृत्ती प्रकरणांची यादी www.mahakosh.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर Circulars and  Orders या टॅब अंतर्गत  माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखाकार, मुंबई व नागपूर कार्यालयाने त्रुटींची पूर्तता करण्याकरिता संबंधित कार्यालय प्रमुखाकडे परत पाठवलेली आहेत. ती अद्यापही कार्यालय प्रमुखांच्या स्तरावर प्रलंबित आहेत.

या प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याशी संबंधित प्रकरणांबाबत संबंधित सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून त्यांच्या त्रुटी निवारणाच्या अनुषंगाने योग्य त्या माहितीसह पेन्शन अदालतीस उपस्थित रहावे व संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना देखील उपस्थित राहण्याबाबत कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. इतर निवृत्तीवेतनधारकांनीही निवृत्तीवेतन प्रकरणी तक्रार असल्यास आपल्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क साधून तक्रारीसह पेन्शन अदालतीमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन वित्त विभागाने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post